Details of MSSC ( Mahila Sanman Saving Certificate) in marathi and hindi

 महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ( Mahila sanman Savings Certificate) 

सदर योजना हि भारत सरकारच्या डाक विभागातर्फे १ एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात  आली आहे . महिल्यांचे सबलीकरणाचा एक भाग म्हणून आपण या योजनकडे पाहू शकतो . सदर योजना हि फक्त २ वर्षे चालणार आहे . या योजने अंतर्गत आपण ३१ मार्च २०२५ पर्यंत या योजनचा लाभ घेऊ शकतो . सादर योजनेची आपण आता सविस्तर माहिती बघूया .

   या योजनेचा फायदा कोणतीही स्त्री घेऊ शकते  ती मुलगी असो व बाई अगदी लहान मुलगी जरी असेल तरीही तो पालकाला जॉईंट करून खाते उघडता येऊ शकते .

    या योजनेची सुरुवात आपण १००० ( एक हजार रुपये ) पासून १०० च्या पटीत २ लाखांपर्यंत करू शकतो .

     सुरुवातीला एकदा पैसे भरले तर त्या खात्या मध्ये पुन्हा पैसे भरता येत नाही .

    उदाहरण - समजा सुरुवातीला तुम्ही दहा हजार रुपये भरून एक प्रमाणपत्र घेतले तर पुन्हा त्यात तुम्ही पैसे भरू शकत नाही . जर तुम्हाला अजून पैसे भरायचे असतील तर तुम्हाला ३ महिने थांबून परत दुसरे प्रमाणपत्र घ्यावे लागेल , त्याला आपण असं म्हणू कि दुसरे खाते उघडावे लागेल 

    या योजने अंतर्गत एक महिला किंवा मुलगी जास्तीत जास्त २ लाख पर्यंत गुंतवणूक करू शकते .

  सर्वात महत्वाचं तुम्हाला प्रश्न पडला असेल याच व्याज दर काय असेल , तर सर्वात मह्त्वाच म्हणजे या योजनेचा व्याजदर डाक विभागाने 

७.५ % एवढा ठेवला आहे . सादर व्याज हे चक्रवाढ पद्धतीने भेटणार आहे .

   यात मिळणारे व्याज हे दर ३ महिन्यांनी तुमच्या बचत खात्या मध्ये जमा होईल . लक्षात असू द्या यात तुमचं पोस्टमध्ये बचत खाते असणे गरजेचे आहे.

    जर एखाद्या स्त्री ला पैशांची खूप गरज भासली  तर , खाते उघडल्या पासून एका वर्षानंतर ४० टक्के पर्यंत रक्कम काढता येऊ शकते.

    जर मुदती आधी कोणाला खाते पूर्ण बंद करायचे असेल तर १)  जर खातेदाराचा मृत्यू झाला किंवा २) ज्याच्या नावे खाते आहे ती महिला खूप गंभीर आजारांनी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली. या दोन कारणांसाठी अर्ज करून आपण हे खाते मुदतपूर्व बंद करू शकतो या साठी व्याज दर हा पूर्णच मिळेल. 

       खाते उघडल्या पासून ६ महिन्यानंतर आपण ते मुदत पूर्व बंद करू शकतो पण या ठिकाणी व्याजदर हा २ टक्क्यांनी कमी मिळेल म्हणजे ५.५ % मिळेल. 

       सादर योजनेची मुदत हि फक्त २ वर्ष राहील २ वर्षानंतर सर्व रक्कम व्याजासह पुन्हा मिळून जाईल. 

    सदर योजनेचा उपभोग घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्या . हि योजना सर्व पोस्ट ऑफिस मध्ये सुरु झाली आहे. 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक चा बँकिंग पॉईंट / पोस्टाचा CSP / banking correspondent

महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे

Term Insurance Information in Marathi.