Fraud , Fake call, Spam Call , Banking Fraud , Information in Marathi.

 फ्रॉड कॉल 

आज मी आपणाला खोटे कॉल कसे येतात आणि आपल्या बरोबर काही फ्रॉड झाला तर कसे वागायचं किंवा काय करायचं या बद्दल सविस्तर पाहूया .


बऱ्याच वेळा कोणाला ना कोणाला फ्रॉड कॉल येत असतात , ते खालील गोष्टी सांगतात 

१) तुमचे खाते बंद पडणार आहे KYC करावी लागेल .

२) तुमचे ATM बंद पडणार आहे.

३) मी बँकेच्या हेड ऑफिस मधून बोलतोय मला तुम्ही माहिती हवी आहे .

       अशे बरेच कारण देऊन समोरील व्यक्ती आपण तिला इंग्लिश मध्ये Fraudster म्हणतो , आपणाकडून आपली माहिती घेतात आणि शेवट येणार OTP ज्याला आपण वन टाइम पासवर्ड म्हणतो तो मागतात आणि आपल्या खात्या मधील सर्व पैसे काढून घेतले जातात . 

ते कॉल वॉर खालील माहिती मागतात .

१) तुमचा आधार कार्ड नंबर 

२) तुमचा प्यान (PAN Card ) नंबर 

३)तुमची जन्म तारीख 

३)शेवटला OTP मागतात 

या फ्रॉड संदर्भात घ्यावयाची काळजी खालील प्रमाणे .

>सर्वात महत्वाचं हे लक्षात घ्या कि कोणतीही बँक कस्टमर ला स्वतःहोऊन काहीही विचारायला कॉल करत नाही . त्यामुळं बँकेच्या संदर्भात कोणताही कॉल आला तर तो कट करून टाकावा हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे .

>जर तुम्हाला काही शंका असेल तर बँकेत जाऊन चौकशी करावी .

>तुम्हाला जर बँक प्रतिनिधी चा नंबर लागत असेल ज्याला आपण (Customer Care Number ) म्हणतो तो बँकेच्या ऑफिसिअल वेबसाईट वरूनच घ्यावा . तो इतर कुठूनही घेऊ नये .

>जर काहीही करून तुमच्या खात्या मधले पैसे उडाले तर . खालील गोष्टी पहिल्या कराव्या .

१) सर्वात पहिले पोलीस स्टेशन ला जाऊन तक्रार द्यावी .

२) बँकेच्या सर्विस सेन्टर ला कॉल करून झालेल्या प्रकारची माहिती द्यावी 

३) सायबर पोलिसांकडे तक्रार करावी .

४) वरील सरव गोष्टी या त्वरित वेळ ना दवडता कराव्या . म्हणजे बँक काहीतरी करू शकते .

>कॉल वर कोणालाही काहीही माहिती देऊ नये .

        हे फ्रॉड करणारे सर्वात पहिले ग्राहकाला काहीतरी भीती दाखवतात आणि मग ग्राहकाला माहिती देण्यास भाग पडतात . त्यामुळं अश्या येणाऱ्या कॉल ची लगेच तक्रार द्यावी . 

          सध्या इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँकेच्या संदर्भात आपण बोलूयात .

 या ठिकाणी फ्रॉड करणारे सांगतात कि तुमच्या खात्याची KYC  करावी लागेल त्या साठी ते माहिती मागवून घेतात . ते  खालील गोष्टी करतात ,

१)एक तर लिंक पाठवून 'any desk ' नावाचं अप्लिकेशन डाउनलोड करायला सांगतात आणि OTP मागवून घेतात या मध्ये काय होते कि आपला मोबाईल समोरील व्यक्ती वापरू शकते .

२)नाहीतर ते स्वतःच्या मोबाईल मध्ये इंडिया पोस्ट बँकेचं मोबाईल बँकिंग अँप्लिकेशन डाउनलोड करून घेतात आणि तुमच्या कडून माहिती मागवून पेयमेन्टस करतात .

       सध्या फेक कॉल आणि फ्रॉड कॉल च प्रमाण वाढलं आहे सर्वांनी या बद्दल खबरदारी द्यावी आणि या बद्दल जनजागृती करावी .

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे

Types Of bank In India Marathi.

इंडियन पोस्ट पेमेंट्स बैंक के खाते के बारेमे जांनकारी .