Suknya samrudhhi yojna , Post office Yojna in marathi .

 सुकन्या समृद्धी योजना ,

सदर योजना हि महिला सबलीकरण करण्या करीत भारत सरकार नि सुरु केलेली आहे , या योजनेमुळे पालकांना जी मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी लागायची त्याचा भार जरा कमी होणार आहे . या योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्याचा सरकारचा मानस आहे . हि योजना भारतीय डाक विभागामार्फत अतिशय महत्वाकांक्षी पद्धतींनी राबवली जाते आहे .

सुकन्या समृद्धी योजनेचे ठळक वैशिष्ट खालील प्रमाणे , 

१) या मध्ये मुलीचे वय १० वर्षाच्या आत हवे .

२) या योजनेत दर वर्षी ३१ मार्च रोजी, पुस्तकावर जमा असलेल्या रकमेवर सरकारने निर्धारित केलेलं व्याज जमा होत , सध्या २०२३-२०२४ मध्ये ८ टक्के या दराने व्याज जमा होईन .

३)यात पैसे आपण आपल्या सोयींनी भरू शकतो . यात फक्त एका वर्षात एक व्यवहार होणे गरजेचे आहे .

४)सदर खाते हे मुलगी सज्ञान होई पर्यंत जॉईंट असते .

५)सदर खाते हे २१ वर्ष चालते , व पालकाला १५ वर्ष यात पैसे भरावे लागतात . 

    या योजनेतील काही बारकावे खालील प्रमाणे ,

१) या योजनेतील पैसे मध्ये कधीच काढता येत नाही .

२) जर एक वर्ष भर कुठलाही व्यवहार झाला नाही तर ५० रुपये दंड भरावा लागतो .

३)मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढण्याची मुभा आहे .

४) मुलीच्या लग्नाच्या १ महिना आधी खाते बंद करता येते जरा खात्याला २१ वर्ष पूर्ण होत नसतील तर .

५)जर खूप दुर्धर आजारांनी मुलीला ग्रासले तर या केस मध्ये पैसे परत मिळवता येतील . पण या ठिकाणी दवाखान्याचा रिपोर्ट लागेल .

खात्या मध्ये पैसे भरण्याच्या मर्यादा 

१)खाते उघडताना सुरुवातीला कमीत कमी २५० रुपये भरावे लागतात .

२)एका वर्षात १ लाख ५० हजाराच्या वर रक्कम भरता येत नाही .

३) तुम्ही रक्कम महिन्याला , दिवसाला , सहामहिन्याला , वर्षातून एकदा कशीही भरू शकतात .

सदर खाते चालू करण्यासाठी लागणारे कागदपत्रे ,

१)मुलीचा जन्माचा दाखला

२) पालकाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड 

३) पालकाचे २ फोटो 

   सदर कागदपत्रे तुम्ही जवळील पोस्ट ऑफिस ला भेट द्यावी.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे

Types Of bank In India Marathi.

इंडियन पोस्ट पेमेंट्स बैंक के खाते के बारेमे जांनकारी .