Term Insurance Information in Marathi.
टर्म प्लॅन . टर्म प्लॅन म्हणजे काय ? एका ठराविक काळासाठी घेतलेला लाईफ( जीवन विमा ) म्हणजे टर्म प्लॅन . यात कोणत्याही प्रकारचा बचत हा घटक नसतो . जर बचत आणि विमा हे दोन्ही एकत्र केले तर तो टर्म प्लॅन न राहता एन्डॉवमेंट( Endowment ) प्लॅन होतो . टर्म प्लॅन आणि एन्डॉवमेंट प्लॅन मधला फरक . टर्म प्लॅन हा पूर्णपणे जीवन विमा आहे यात कोणताही बचतीचा घटक समाविष्ट नाही म्हणून याचा प्रीमियम खूप कमी असतो . या उलट एन्डॉवमेंट प्लॅन मध्ये बचत आणि विमा हे दोन्ही घटक असल्या मूळ त्याचा प्रीमियम खूप जास्त जातो. टर्म प्लॅन मध्ये मिळणार रिस्क कव्हर हा खूप जास्त असतो . एन्डॉवमेंट प्लॅन मध्ये रिस्क कव्हर खूप कमी मिळतो . हे झाले २ हि प्लॅन मधील फरक . आता आपण फक्त टर्म प्लॅन बद्दल सविस्तर माहिती घेऊया . टर्म प्लॅन हा खूप जास्त कव्हर ,एका ठराविक काळासाठी घेतला जातो आणि त्याला प्रीमियम सुद्धा कमी बसतो . टर्म प्लॅन मध्ये आपल्याला वेगवेगळे रायडर घेता येतात. म्हणजे कस , आपण फक्त टर्म प्लॅन काढला तर ज्यांनी प्लॅन काढला आहे त्याचा जर पोलिसी पिरियड मध्ये मृत्यू ...