Term Insurance Information in Marathi.
टर्म प्लॅन .
टर्म प्लॅन म्हणजे काय ?
एका ठराविक काळासाठी घेतलेला लाईफ( जीवन विमा ) म्हणजे टर्म प्लॅन . यात कोणत्याही प्रकारचा बचत हा घटक नसतो .
जर बचत आणि विमा हे दोन्ही एकत्र केले तर तो टर्म प्लॅन न राहता एन्डॉवमेंट( Endowment ) प्लॅन होतो .
टर्म प्लॅन आणि एन्डॉवमेंट प्लॅन मधला फरक .
टर्म प्लॅन हा पूर्णपणे जीवन विमा आहे यात कोणताही बचतीचा घटक समाविष्ट नाही म्हणून याचा प्रीमियम खूप कमी असतो .
या उलट एन्डॉवमेंट प्लॅन मध्ये बचत आणि विमा हे दोन्ही घटक असल्या मूळ त्याचा प्रीमियम खूप जास्त जातो.
टर्म प्लॅन मध्ये मिळणार रिस्क कव्हर हा खूप जास्त असतो .
एन्डॉवमेंट प्लॅन मध्ये रिस्क कव्हर खूप कमी मिळतो .
हे झाले २ हि प्लॅन मधील फरक . आता आपण फक्त टर्म प्लॅन बद्दल सविस्तर माहिती घेऊया .
टर्म प्लॅन हा खूप जास्त कव्हर ,एका ठराविक काळासाठी घेतला जातो आणि त्याला प्रीमियम सुद्धा कमी बसतो . टर्म प्लॅन मध्ये आपल्याला वेगवेगळे रायडर घेता येतात. म्हणजे कस , आपण फक्त टर्म प्लॅन काढला तर ज्यांनी प्लॅन काढला आहे त्याचा जर पोलिसी पिरियड मध्ये मृत्यू झाला तर तर सर्व रक्कम वारसाला ( nominee ) ला मिळून जाते पण जर आपण रायडर घेतले जसे कि क्रिटिकल इलनेस ( critical illness ) म्हणजेच गंभीर आजार जर आपणाला पोलिसी पिरियड मध्ये झाला तर आपणाला त्याच्या उपचारासाठी काही रक्कम विमा कंपनि अदा करते . तसेच अजूनही काही रायडर असतात जे आपण टर्म प्लॅन घेऊ शकतो .
टर्म प्लॅन हा कमी वयातच घेतलेला फायद्याचा असतो त्याचे कारण खालील प्रमाणे ,
१) कमी वयात मुख्य म्हणजे हप्ता कमी बसतो .
२) कमी वयात आपण निरोगी असतो , त्यामुळे टर्म प्लॅन ना- मंजूर होण्याचे कारणच नाही .
३)जास्त वयात टर्म प्लॅन चा हप्ता पण जास्त लागतोच तसेच मेडिकल टेस्टमध्ये काही निघण्याचे चान्सेस वाढतात .
४) टर्म प्लॅन हा सहजा सहजी मिळणार विमा नाही म्हणून कमी वयातच तो लवकर मिळून जातो .
टर्म प्लॅन कोण घेऊ शकतो ?
१)जो व्यक्ती पगारी आहे म्हणजेच ज्याला महिन्या पगार मिळतो आणि त्याला पगाराची स्लिप मिळते आणि ज्याचे उत्पन्न २५००० च्या वर आहे दार महिन्याला .
२) जर बिजनेस करणारा व्यक्ती असेल तर तो ITR ( इनकम टॅक्स रिटर्न ) भरणारा असावा .
३) क्षिक्षण कमीत कमी १०वी झालेलं असावे .
टर्म प्लॅन कोणत्या कंपनीचा घ्यावा ?
यात आम्ही काही ठरवू शकत नाही पण जर तुम्ही स्वतः थोडा कंपनीचा अभ्यास केला , त्याचे टर्म आणि कंडिशन वाचल्या , तसेच क्लेम सेटलमेंट रेशो चेक केला आणि माईन म्हणजे तुम्हाला जो परवडेल त्या कंपनीचा टर्म प्लॅन तुम्ही घेऊ शकतात .
टीप- टर्म प्लॅन हा आपल्या नंतर आपल्या कुटुंबासाठी केलेली तरतूद आहे . त्यामुळं प्रत्येक व्यक्तीने त्याच्या जीवनात कमीत कमी एक तरी कमीत कमी ५० लाखाचा प्लॅन काढावा .
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें