इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक चा बँकिंग पॉईंट / पोस्टाचा CSP / banking correspondent

 इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक चा बँकिंग पॉईंट / पोस्टाचा CSP / banking correspondent

तर आज आपण IPPB च्या बँकिंग पॉईंट विषयी माहिती पाहणार आहोत .

या पॉईंट ला इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक मध्ये बँकिंग करस्पॉन्डन्ट म्हणतात (IBC) .

पोस्टाच्या बँकिंग पॉईंट मध्ये मिळणाऱ्या सुविधा खालील प्रमाणे .

१)अकाउंट ओपनिंग 

२)AEPS (आधार नंबर वरून कोणत्याही बँके मधले पैसे काढून देणे )

३)कोणत्याही बँकेच्या ATM कार्ड मधून पैसे काढून देणे.

४)DMT (कोणत्याही बँकेच्या खात्यामध्ये पैसे भरणे )

५)इन्शुरन्स म्हणजे विमा , यात मग तुम्हाला वेहिकल विमा ( vehicle insurance ), आरोग्य विमा( health insurance ) , जीवन विमा (life insurance ) , अपघाती विमा ( Personal accident insurance ) इतकं. या सर्वांचा समावेश होतो .

६)बिल पेयमेन्टस जसे कि लाईट बिल भरणे , मोबाईल रिचार्जे करणे , इत्यादी ..

७)पोस्टाच्या योजनांचे पैसे भरणे .

८) यात आधारही संबंधित कोणतीही सुविधा मिळणार नाही याची सर्वांनी खबरदारी घायवी. सध्या youtube , वर काहीही खोटी माहिती पसरवली जाते त्यावर विश्वास ठेऊ नका .

आता आपण पाहू कि हा पॉईंट घ्याचा कसा .( how to apply for IPPB BC Point )? 

सर्वात प्रथम IIBF (indian institute of banking and finance ) ची परीक्षा पास असणे अनिवार्य आहे .

पॉईंट साठी लागणारे सर्व कागपत्रे खालील प्रमाणे.

१)अँप्लिकेशन फॉर्म जो वेबसाईट वर मिळतो किंवा बँकेत जाऊन घेऊ शकतात 

२)त्या फॉर्म बरोबर ते annexure ३ आणि annexure १४ देतात आणि एक घोषणापत्र देतात .

३)KYC डॉक्युमेंट यात आधार कार्ड आणि प्यान कार्ड.

४)शैक्षणिक कागदपत्रे कोणतेही एक ( कमीत कमी १०वी पास असे अनिवार्य आहे )

५)शॉप ऍक्ट किंवा उद्यम आधार 

६)आपण काम करणार असणाऱ्या जागेचा भाडे करार किंवा जर जागा स्वतःची असेल तर लाइट बिल 

७)पोलीस वेरिफिकेशन 

७) IIBF प्रमाणपत्र 

८)csc प्रमाणपत्र असेल तर अनिवार्य नाही 

९) ६ महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट 

१०) ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर 

११) २ फोटो ( पासपोर्ट साईज )

१२) इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक चे खाते असणे अनिवार्य आहे .

१३) इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक च्या खात्या मध्ये ६२०० रुपये टाकणे अनिवार्य आहे .

                    वरील सर्व कागद पत्रांची पूर्तता करून जवळील इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक च्या शाखेला भेट द्यावी .

कागद पात्र जमा केल्या नंतर आपल्या दुकानात भेट देण्यासाठी बँकेचे अधिकारी येतात ते सर्व ओरिजिनल कागदपत्रांची तपासणी करतात आणि दुकानाचे फोटो काढून नेतात आणि लोकेशन घेऊन जातात .

                      या प्रक्रियेनंतर आपला विडिओ कॉल वर इंटरव्हिव्ह होतो . आणि मग आपल्याला ID मिळतो .

या सर्व प्रक्रियेला जवळ जवळ १ महिना संपूर्ण लागतो याची सर्वांनी खबरदारी घ्यावी .

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे

Term Insurance Information in Marathi.